बॅड पॅच

बॅड पॅच

लाईफ मध्ये बॅड पॅच हा बॅड असतो कि गुड यात मी आजही confused आहे…
म्हणजे पहा ना या बॅड पॅच मधेच आपल्याला आपले खरे आस्तित्व काय ते समजते…
आपले कोण परके कोण हा बॅड पॅच च ओळख करून देतो….
मग अनेक आपले आपले राहत नाहीत काही परके परके राहत नाहीत…
खऱ्या खोट्याची ओळख या बॅड पॅच मधेच तर होते….
आपण कोण आहोत…हेही याच वेळी समजते…
कालपर्यंत तू बोल फक्त तुझ्यासाठी जीव द्यायलाही तयार आहे म्हणणारा मित्र पण गायब होतात…

आयुष्यात अनेक कटू प्रसंग हे तुम्हाला नामोहरम करण्यासाठीच येतात. अनेक जवळची माणसं विश्वासघात करतात, अनेकजन तुमचा संयम पडताळून पहातात, परीक्षा पहातात, तुमच्या उध्वस्त होण्याची वाट पहातात…
काहीजण मदत करण्याचा आव आणतात… अश्या परिस्थितीत खचून जाणे साहजिक आहे…. पण हीच परिस्थिती आपल्याला खंबीर बनवते…. जगायचं कस शिकवते…. आपलं कोण परकं कोण दाखवून देते….

….MK

What's your reaction?
Leave A Comment

Your email address will not be published. Required fields are marked *